Top News

महा RERA येथे पदवीधरांना महिना 42 हजार पगाराची नोकरी; लिपिक, सहाय्यक, शिपाईसह विविध पदांची भरती | Maha RERA Bharti 2024




  मुंबई | महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Maha RERA Bharti 2024) केली जाणार आहे. याठिकाणी उच्च वर्ग लघुलेखन, स्टायलिस्ट, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Maha RERA Bharti 2024

वरील रिक्त पदांच्या 37 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उच्च वर्ग लघुलेखनमान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी.इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि. व मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र.MS-CIT प्रमाणपत्र.न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक.
स्टायलिस्टमान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी.इंग्रजी ८० श.प्र.मि. व मराठी ८० श.प्र.मि. लघुलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र.MS-CIT प्रमाणपत्र.न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक
अधीक्षक मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी. (विधी पदवीधारकास प्राधाण्य देण्यात येईल.)न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अधिक्षक किंवा सहायक अधिक्षक पदाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक.
सहायक अधीक्षकमान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी.न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील सहायक अधिक्षक किंवा वरिष्ठ लिपीक पदाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव आवश्यक.
वरिष्ठ लिपिकमान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी.न्यायालय किंवा न्यायाधीकरणा मधील येथील ०३ ते ०५ वर्षाचा वरिष्ठ लिपीक पदाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव.
अभिलेखापालमान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी.न्यायालय किंवा न्यायाधीकरणा मधील अभिलेखा विभागातील ०२ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव.
तांत्रिक सहाय्यकमान्यताप्राप्त विदयापीठाची विज्ञान (संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान) शाखेतील पदवी.न्यायालय किंवा न्यायाधीकरणाचा ०१ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव.
कनिष्ठ लिपिक मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी उत्तीर्ण असने आवश्यक आहे.मराठी टंकलेखन वेग ३० श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मी. उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे.MS-CIT प्रमाणपत्र. न्यायालय, न्यायाधीकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधीकरणामधील लिपीक पदाचा ०२ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव.
लिपिकमान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी उत्तीर्ण असने आवश्यक आहे.मराठी टंकलेखन वेग ३० श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मी. उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे.MS-CIT प्रमाणपत्र.न्यायालय, न्यायाधीकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधीकरणामधील कनिष्ठ लिपीक पदाचा किमान ०२ वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव.
शिपाईउच्च माध्यमिक शालांत परीक्षा उर्तीण असने आवश्यक आहे.न्यायालय, न्यायाधीकरण, राज्य विधी सेवा प्राधीकरण किंवा नामांकित कायदा फर्म यामध्ये कमीत कमी ०६ महिण्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव.
पदाचे नाववेतनश्रेणी
उच्च वर्ग लघुलेखनRs.41,800/-
स्टायलिस्टRs.३४७६०/-
अधीक्षकRs.३८६००/-
सहायक अधीक्षकRs.३४७६०/-
वरिष्ठ लिपिकRs.३४७६०/-
अभिलेखापालRs.३२८००/-
तांत्रिक सहाय्यकRs.३५०००/-
कनिष्ठ लिपिकRs.३२८००/-
लिपिकRs.३२८००/-
शिपाईRs.२५०००/-

वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरात – Maha RERA Bharti 2024
अधिकृत वेबसाईट – https://maharera.maharashtra.gov.in/

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने