Shabari Adivasi Gharkul Scheme : नगरपरिषद भद्रावती क्षेत्रातील अनुसूचित जमाती व्यक्तींना स्वतःच्या जागेवर किंवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजने (Shabari Adivasi Gharkul Scheme) अंतर्गत रु. 3 लाख उत्पन्न मर्यादा असलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी 20 मार्च 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. Shabari Adivasi Awas Yojana
या योजनेच्या लाभासाठी अर्जदारानी नगरपरिषद भद्रावती येथे परिपूर्ण अर्ज सादर करावेत. असे आवाहन नगरपरिषद भद्रावती चे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.विशाखा शेळकी यांनी केले आहे.
सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामासाठी अनुदान देण्यात येते. योजनेच्या लाभासाठी लाभार्थी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती घटकातील असावा. लाभार्थ्यांकडे पक्के घर नसावे किंवा लाभार्थी बेघर असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रूपये ३ लक्ष पर्यंत असावे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी ७/१२ उतारा, मालमत्ता नोंदपत्र, मालमत्ता नोंदवहीतील उतारा यापैकी एक, घरपट्टी, पाणीपट्टी, विद्युत बिल या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र आवश्यक आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रत,
सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेला उत्पन्नाचा दाखल, दि. १/२/१९९५ च्या किंवा मतदार यादितील नांवाचा उतारा, निवडणुक ओळखपत्र, रेशनकार्ड, मालमत्ता कर भरल्याची पावती, सध्याचा कच्च्या घराचा फोटो, तहसीलदार यांनी दिलेले रहिवास प्रमाणपत्र किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे, असेही कळविले आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1C3U0xp_edg07EEuohqEZJ3F1XVncR0M4/view?usp=drivesdk
टिप्पणी पोस्ट करा