Top News

Career Options after 10th: 10 वी नंतर काय करावे? कोण कोणते करियर आहेत, जाणून घ्या संपूर्ण माहिती

 





Career Options after 10th: आजचे आर्टिकल मध्ये मी तुम्हाला 10 वी नंतर काय करावे? कोणते करिअर निवडावे? यासंबंधी माहिती देणार आहे. सोबतच कोण कोणते करिअर दहावी नंतर उपलब्ध असतात, जे तुम्हाला करता येतात, त्याची माहिती देखील या लेखामध्ये मी दिलेली आहे.



जर तुमची दहावी झाली असेल किंवा आत्ताच तुमचा दहावीचा निकाल लागला असेल, तर तुमच्यासाठी या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. माहिती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा, Skip करू नका, थोडासा वेळ काढून हे आर्टिकल पूर्ण वाचा कारण भविष्याचा प्रश्न आहे.

दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे करिअरचे ऑप्शन्स उपलब्ध असतात, यामध्ये काही डिप्लोमा कोर्स हे देखील समाविष्ट आहेत. तुम्हाला जर पुढे शिक्षण सुरू ठेवायचे असेल तर तुम्ही 11 वी आणि 12 वी मध्ये देखील आपले Admission करू शकता.



खाली मी दहावीनंतर करता येणारे काही करिअरचे ऑप्शन दिले आहेत, त्यामध्ये तुमच्या आवडीचं कोणतेही करिअर तुम्ही निवडून दहावी नंतर त्या करिअरसाठी तुम्ही तयारी करू शकता.



Science Stream (विज्ञान शाखा)



विज्ञानामध्ये ज्या विद्यार्थ्यांची रुची आहे त्यांना विज्ञान शाखा निवडून अकरावी बारावी पर्यंत शिक्षण घेऊन पुढे Science Stream मधून करियर करता येते. यामधे खूप साऱ्या Interesting अशा Fild आहेत ज्यात तुम्ही जाऊ शकता. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यामधे ज्यांना आवड आहे ते विद्यार्थी मेडिकल, इंजिनियर या फील्ड मध्ये जाऊ शकतात.



Commerce Stream (कॉमर्स शाखा)



ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक बाबी तसेच अर्थशास्त्र, कॉमर्स (वाणिज्य) या विषयामध्ये जास्त रुची आहे ते विद्यार्थी अकरावी बारावी मध्ये कॉमर्स शाखेतून शिकून यामध्येच करिअर घडवू शकतात. कॉमर्स शाखेतून बँकिंग मध्ये देखील जाता येते, तसेच तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तरीदेखील कॉमर्स शाखा तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. यामधे मुख्य असे करियर Options आहेत CA, CS, CMA आणि बँकिंग.



Arts Stream (कला शाखा)



ज्या विद्यार्थ्यांना साहित्य आणि कला या विषयात रुची आहे त्यांच्यासाठी कला शाखा उत्तम आहे, यामधे तुम्ही इतिहास, तत्वज्ञान, समाजशास्त्र अशा वेगवेगळ्या Stream मध्ये करियर करू शकता. कला शाखेत जे विद्यार्थी शिकले आहेत त्यांना आर्मी आणि इतर स्पर्धा परीक्षा साठी देखील संधी असते.



10 वी नंतर करता येणारे डिप्लोमा कोर्स

दहावीनंतर विद्यार्थ्यांना डिप्लोमा कोर्स देखील करता येतात, ज्यातून डिप्लोमा केल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरी देखील मिळते. या ठिकाणी काही डिप्लोमा कोर्सची माहिती आपण दिली आहे, त्यानुसार तुम्ही त्या डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेश घेऊन डिप्लोमा चा अभ्यास करून नोकरी मिळवू शकता.



Hotel Management



सध्या हॉटेल आणि हॉटेल मॅनेजमेंट संबंधीचे करिअर यांना चांगला वाव मिळत आहे, तुम्ही जर दहावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला तर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट मधून नोकरी मिळू शकते. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला तर हॉटेल हॉस्पिटलिटी इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळण्यास सोपे होते.



Computer Hardware and Networking



आजकाल सर्वत्र इंटरनेट आणि कम्प्युटरचे Panitraction झाले आहे, लोक मोठ्या प्रमाणात कम्प्युटर हार्डवेअर लॅपटॉप यासारखे Device वापरत आहेत. त्यामुळे तुम्ही जर Computer Hardware and Networking हा कोर्स केला तर तुम्हाला यातून चांगली नोकरी मिळू शकते.



Enginiaring Diploma



अनेक विद्यापीठांमध्ये संस्थेमध्ये सध्या पॉलिटेक्निक इंजीनियरिंग यासारखे डिप्लोमा कोर्स 10 वी नंतर करता येतात. जर तुम्हाला 10 वी नंतर थेट अभियांत्रिकी क्षेत्रात जायचे असेल तर Enginiaring Diploma हा एक चांगला पर्याय आहे.



ITI डिप्लोमा कोर्स



दहावीनंतर एक चांगला आणि प्रसिद्ध असा डिप्लोमा कोर्स म्हणजे ITI कोर्स, या कोर्सद्वारे तुम्ही इलेक्ट्रीशियन, वेल्डर, फिटर, कारपेंटर, मेकॅनिक, स्टेनो, कॉम्प्युटर अशा वेगवेगळ्या ट्रेड मध्ये डिप्लोमा करून अगदी सहज पणे तुमच्या Skills च्या आधारावर नोकरी मिळवू शकता. सोबत तुम्ही जे शिकला आहात त्याचा वापर करून स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करु शकता.



स्टेनोग्राफी अँड टायपिंग



दहावीनंतर करिअरचा एक चांगला पर्याय म्हणजे स्टेनोग्राफी किंवा टायपिंग, हा कोर्स करून तुम्ही टायपिंग असिस्टेनोग्राफी यासंबंधीच्या स्किल्स Acquired करू शकता. ज्या द्वारे तुम्ही कोणत्याही सरकारी कार्यालयात तसेच न्यायालयामध्ये नोकरी मिळवू शकता.





याव्यतिरिक्त तुम्ही दहावीनंतर वेगवेगळ्या सरकारी नोकरांसाठी देखील तयार करू शकता, दहावी पास वर सैन्य भरती देखील होते. तसेच दहावी पास वर तुम्ही विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा आणि आर्ट शाखा यामध्ये देखील अकरावी-बारावी साठी ऍडमिशन घेऊन त्यामध्ये करिअर करू शकता.



10 वी नंतर कोणत्या सरकारी नोकरी साठी अर्ज करता येतो?

Indian Postal Service: Postman

State Police Constable

Armed Forces Job

Forest Guards

Railway Jobs Under Grade 4

Marchant navy

Indian Army

Air Force

BSF

BSF RO

BSF Constable

Indian Army Agniveer

Air Force Agniveer

Indian Navy Agniveer

Indian Navy Tradsman

SSC MTS

Delhi Police MTS

AOC Fireman

Court Peon

Ticket Collector (Railway)

Gateman (Railway)

Station Master (Railway)

Security Guard (Bank)

याव्यतिरिक्त अनेक असे जॉब भरती आहेत, ज्यासाठी तुम्ही वी पास वर अर्ज सादर करू शकता.



करिअरचे ऑप्शन भरपूर आहेत त्यासाठी आम्ही Specialy एक Image Cover बनवेल आहे, जेणेकरून तुम्हाला 10 वी नंतर काय करावे? कोणते करियर निवडावे? यासाठी मदत होईल.

Career Options after 10th


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने