Pune News : कर्नाटकमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून
लवकरच सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळेल असा दावा कर्नाटकचे महसूल मंत्री कृष्णा बायरे गौडा यांनी केला आहे. महसूल मंत्री गौडा यांनी सांगितले की, येत्या दोन-तीन दिवसांत सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळेल. कर्नाटकला केंद्र सरकारकडून ३, ४५४.२२ कोटी रुपये मिळणार आहे. पण याआधीच राज्य सरकारने ३३.५८ लाख शेतकऱ्यांना सरकारी तिजोरीतून ६३६.४५ कोटी रुपयांची अंतरिम मदत देण्यात आली होती. यामध्ये अल्प भूधारक असलेल्या ४.४३ लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर ही सर्व मदत त्यांच्या पात्रतेनुसार देण्यात आली आहे.
तसेच अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी ५,६६२ कोटी रुपयांचा या विनंतीत समावेश आहे. कर्नाटकने १३ सप्टेंबर २०२३ रोजी २२३ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते. दुष्काळामुळे ४८ लाख हेक्टरवरील पिके नष्ट होऊन ३५, १६२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावाही सरकारकडून करण्यात आला होता.
राज्य सरकारच्या रिटवर सुनावणी
दरम्यान कर्नाटक सरकारने दाखल केलेल्या रिट याचिकेवर न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सोमवारी (ता. ०६) सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला यावरून उत्तर देण्याचे आदेश दिले होते. सप्टेंबर २०२३ मध्ये दुष्काळग्रस्त भागात मदत कार्य सुरू करण्यासाठी कर्नाटक सरकारने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे १८, १७४ कोटी रुपयांची मागणी केली होती.
यावेळी केंद्र सरकारला या रिट याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश दिले होते. यावरून कर्नाटकला दुष्काळ निवारणासाठी दिलेली आर्थिक मदत सरकारच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जारी करण्यात आल्याचे अॅटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी यांनी केंद्र सरकारतर्फे म्हटले होते.
टिप्पणी पोस्ट करा