Top News

महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजना मिळणार 25 हजार रुपये.

 



महाराष्ट्र राज्यामध्ये कन्यादान अनुदान योजना ही राबवली जात होती या अंतर्गत नवविवाहित जोडप्यांना काही प्रमाणामध्ये आर्थिक मदत म्हणजेच अनुदान देण्यात येत होते.

या योजनेअंतर्गत आता नवविवाहित जोडप्यांना एकूण 25 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत शासन निर्णय म्हणजे जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे.

जर तुम्हाला हा जीआर बघायचा असेल तर लेखाच्या शेवटी तुम्हाला जीआर डाऊनलोड लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या लिंक वर क्लिक करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ही माहिती संपूर्ण सविस्तरपणे बघू शकता.

महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजना कोणती लाभार्थी आहे पात्र

या योजने अंतर्गत विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित जोडप्यांना अनुदान देण्यात येणार आहे.

यापूर्वी या योजनेअंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांना एकूण 20 हजार रुपये व विवाह आयोजित करणाऱ्या चार हजार रुपये अनुदान देण्यात येत होते.

कशा पद्धतीने मिळणार अनुदानात वाढ बघा सविस्तर माहिती खालीप्रमाणे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 20 मे 2023 रोजी सामूहिक विवाह सोहळा दरम्यान महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजना अंतर्गत अनुदानात वाढ करण्याची घोषणा केलेली आहे.

महाराष्ट्र कन्यादान योजना अंतर्गत आता पात्र लाभार्थ्यांना एकूण 25 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. ही माहिती शासन निर्णय जीआर मध्ये करण्यात आलेली आहे.

महिला व बाल विकास अभियाना अंतर्गत शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह अंतर्गत नवविवाहित जोडप्यांना एकूण 25 हजार रुपये व तसेच विवाह करणाऱ्या संस्थेला 2500 रुपये एवढे अनुदान वाढून देण्याचा निर्णय दिनांक 13 मार्च 2024 रोजी केलेला आहे.

शासन निर्णय बघा

महाराष्ट्र कन्यादान अनुदान योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान वाढवून देण्यात येणार आहे हे हे अनुदान 25000 पर्यंत वाढवण्यात आलेले आहेत तसेच विवाह आयोजित करणाऱ्या संस्थेला दोन हजार पाचशे रुपये अनुदान वाढवून घेण्यात येणार आहे.

ही माहिती दिनांक 18 जून 2024 रोजी महाराष्ट्र शासन इतर मागास व बहुजन कल्याण विभाग अंतर्गत कळविण्यात आलेला आहे.

सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय वर्गांना या योजनेअंतर्गत हे अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या वधूला 20 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान वधूच्या पालकांच्या नावे जमा करण्यात येते.

याच अनुदानामध्ये वाढ करून ही रक्कम 25 हजार इतकी करावी यासाठी मान्यता देण्यात येत आहे.ही सविस्तर माहिती तुम्ही जी आर मध्ये सुद्धा बघू शकता जीआर डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

लाडका भाऊ योजना अर्ज सुरू

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने