Top News

Ladka Bhau Yojna 2024 : बेरोजगार तरुणांना मिळणार 10000 रुपये; १० मिनिटात करा ऑनलाईन अर्ज, पहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

 



Ladka Bhau Yojna 2024 : गरीब महिलांसाठी महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहिणी योजना आणली याचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत आहेत यानंतर शासनाला राज्यातील बेरोजगार तरुणांना सुद्धा दहा हजार रुपये पर्यंत मदत मिळवून देणारी एक योजना आणली आहे.

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात त्या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सेवा असे या योजनेचे नाव आहे या योजनेला लाडका भाऊ योजना म्हणून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधले होते, या योजनेसाठी 10 मिनिटात अर्ज भरता येणार आहे त्याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली घेणार आहोत.

काय आहे लाडका भाऊ योजना (Ladka Bhau Yojna 2024) ?

राज्यातील बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणारी ही योजना आहे याद्वारे बारावी पास असलेल्या तरुणांना 6000 रुपये प्रति महिना, बारावी पास चा डिप्लोमा धारकांना 8000 रुपये प्रति महिना.

तर ग्रॅज्युएशन किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण असलेल्या तरुणांना 10000 रुपये प्रति महिना इतका विद्या वेतन देण्यात येणार आहे,लाडकी बहिण योजना सारखी ही थेट मदत नाही तर कौशल्य शिकण्यासाठी आर्थिक मदत असणार आहे.

या योजनेचे फायदे काय (Ladka Bhau Yojna 2024 Benefits)?

या योजनेसाठी पात्र असलेल्या तरुणांना कोणत्याही कंपनीत एका वर्षासाठी अप्रेंटिसशिप करावी लागेल या काळात या तरुणांना विद्या वेतन म्हणून 6000 रुपये ते 10000 रुपये प्रत्येक महिन्याला सरकारकडून मिळणार आहे.

स्टायपेंडची रक्कम लाभार्थ्याच्या थेट खात्यात जमा केली जाणार आहे या योजनेद्वारे प्रत्येक वर्षी 10 लाख बेरोजगार तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्याचं लक्ष ठेवलेलं आहे.

लाभार्थ्यांनी ज्या कंपनीत अप्रेंटीशीप पूर्ण केली आहे त्यांना त्याच कंपनीत नोकरीसाठी अर्ज देखील करता येणार आहे.

लाडका व योजनेसाठी कोण पात्र असेल (Ladka Bhau Yojna 2024 Eligibility) ?

  • या योजनेसाठी कमीत कमी 18 ते 35 वर्षे वयोगटातील असे तरुण पात्र ठरतील ज्यांच्याकडे कुठलाही रोजगार नाही.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं डोमोसाईल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.
  • उमेदवार कमीत कमी बारावी पास असणे गरजेचे आहे.
  • योजनेसाठी अर्ज केले तरुणांना शासनाच्या इतर कुठल्याही भत्ता योजनेचा लाभ मिळालेला नसावा किंवा मिळत नसावा.
  • लाभार्थी तरुणाचा बँक खाते हे आधार लिंक असणे बंधनकारक आहे.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • उत्पनाचा दाखला
  • वयाचा दाखला
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • ईमेल आयडी
  • बँक खात्याच पासबुक
  • मोबाईल क्रमांक व पासपोर्ट साईज फोटो

अर्ज कसा करावा ?

  1. या योजनेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खालील दिलेल्या लिंक वरून (Ladka Bhau Yojna 2024) महाराष्ट्र सरकारच्या महास्वयम रोजगार पोर्टलवर जावं लागेल खाली लिंक दिलेली आहे ती लिंक ओपन केल्यानंतर
  2. रजिस्टर या बटनावर क्लिक करा
  3. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाईप करा मोबाईल आलेला ओटीपी व्हेरिफाय करून घ्या
  4. यानंतर तुमच्यासमोर योजनेसाठी रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल
  5. फॉर्म मधील सर्व माहिती काळजीपूर्वक भर
  6. माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे तिथेच अपलोड करा
  7. त्यानंतर शेवटी तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल
  8. यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी म्हणजे युजरनेम आणि पासवर्ड मिळेल
  9. यानंतर लॉगिन करून इतर माहिती भरा
  10. त्यानंतर पुन्हा तुमच्या मोबाईलवर व्हेरिफिकेशन चा ओटीपी येईल हा ओटीपी संबंधित ठिकाणी भरून क्लिक करा म्हणजे तुमचा अर्ज भरून पूर्ण होईल.
लाडका भाऊ योजनेत अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने