Top News

बॅटरी संचलित फवारणी पंप मिळविण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज Battery pump

 







जाणून घेवूयात  बॅटरी संचलित फवारणी  पंप Battery pump संदर्भात सविस्तर माहिती.कपाशी, सोयाबीन इत्यादी पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी शेतकरी बांधवाना फवारणी पंपाची आवश्यकता असते.


शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदी करण्यासाठी अगोदरच शेतकरी बांधवांकडे पैसे नसतात परंतु औषध फवारणी करायची असेल तर पंप घ्यावाच लागतो.


बॅटरी संचलित फवारणी पंप मिळविण्यासाठी ऑनलाईन करावा लागेल अर्ज

जर फवारणी पंप नसेल तर ज्यांच्याकडे पंप आहे त्यांच्याकडून औषधांची फवारणी करून घ्यावी लागते यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतात.


तुम्हाला स्वतः औषध फवारणी करायची असेल मात्र तुमच्याकडे औषध फवारणी करण्यासाठी पंप नसेल तर तुम्हाला आता शासकीय अनुदानावर बॅटरीवर चालणारा पंप मिळणार आहे.


बॅटरीवर चालणारा पंप अनुदानावर मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.


अनुदानावर मिळेल फवारणी पंप Battery pump

बॅटरीवर चालणारा औषध फवारणी  पंप खरेदी करायचा असेल तर मार्केटमध्ये यासाठी पैसे द्यावे लागतात. परंतु हाच औषध फवारणी पंप तुम्हाला शासकीय अनुदानावर मिळतो.


 कापूस सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पिक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करून कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे.


या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.


शासकीय अनुदानावर औषध फवारणी पंप खरेदी करण्यासाठी तुम्हाला अगोदर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.


औषध फवारणी करण्यासाठी अनेक  पंप असतात परंतु बॅटरी संचलित फवारणी पंप  असेल तर शेतामध्ये फवारणी करणे खूपच सोपे जाते.


बॅटरीवर चालणारा औषध फवारणी पंप खरेदी करण्यासाठी महाडीबीटी या वेबपोर्टलवर अर्ज करावा लागतो. केवळ महाडीबीटी या वेब पोर्टलवर अर्ज करा असे म्हणून चालणार नाही तर या संदर्भात तुम्हाला अगदी सविस्तर माहिती मिळावी यासाठी आम्ही बांधील आहोत.


अर्ज करण्याची लिंक


अशा पद्धतीने तुम्ही फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता


 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने