शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत सन 2022 मध्ये झालेल्या पावसाळी हंगामामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते या अंतर्गत आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून काही अनुदान देण्यात येणार आहे.
हे अनुदान कशाप्रकारे देण्यात येणार आहे यासाठी कोणते जिल्हे पात्र आहे व कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.
दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी या संदर्भात एक शासन निर्णय म्हणजेच जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ही माहिती सविस्तरपणे बघायची असेल किंवा वाचायची असेल तर लेखाच्या शेवटी जीआर डाऊनलोड करा असे बटन दिसेल यावर ती क्लिक करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ही माहिती अगदी सविस्तरपणे अधिकृतरित्या वाचू शकतात.
शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत शासन निर्णय बघा
सन 2022 च्या पावसाळी हंगामामध्ये सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत चा हा शासन निर्णय आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.
सन 2022 मध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी दिनांक 20 6 2023 च्या शासन निर्णयान्वये चार जिल्ह्यांमध्ये एकूण 48094.60 लक्ष इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.
तदनंतर अंतर्गत पुर्नवितरणाने 55555.34 इतका निधी डीबीटी प्रणालीद्वारे वितरित करण्यात केला होता. याव्यतिरिक्त जिल्हाधिकारी, अहमदनगर वाशिम परभणी व अमरावती या जिल्ह्यांना 6116.74 इतका अतिरिक्त निधी मागणीस मंजुरी देण्यात येत आहे.
तसेच यासाठी एकूण 61672.08 इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात येत आहे.
यामध्ये एकूण चार जिल्हे पात्र ठरविण्यात आलेले आहे जे म्हणजे वाशिम अहमदनगर परभणी व अमरावती हे चार जिल्हे यामध्ये पात्र ठरविण्यात आलेले आहे.
ही माहिती दिनक १० सप्टेंबर २०२४ रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे. हा जीआर तुम्ही तुमच्या मोबाईल डाऊनलोड करू शकता.
ही अनुदानाची रक्कम लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.शासन निर्णय म्हणजेच जीआर डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
टिप्पणी पोस्ट करा