मुंबई : ऑक्टोबरमध्ये सणावर आणि शनिवार रविवार अशा मिळून भरपूर सुट्ट्या असल्याने बँकेतील कामं थोडी रखडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी 11 ऑक्टोबर रोजी सरकारी आणि खासगी बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे तुम्ही बँकेत जाण्यापूर्वी नियोजन करा. 11 ऑक्टोबर रोजी महाअष्टमीचा उत्सव केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुट्टी देण्यात आली आहे.
11 ऑक्टोबर 2024 रोजी महानवमीचा सण साजरा केला जाणार आहे, त्यामुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. त्रिपुरा, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, बिहार, झारखंड आणि मेघालयमध्ये सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका बंद राहतील.
मात्र, ग्राहकांना बँकिंग सेवेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ऑनलाइन बँकिंग सेवा सुरूच राहणार आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी बँक सेवा सुरू राहणार आहेत. शनिवार आणि रविवारी बँका बंद असतील.
12 ऑक्टोबर (दसरा/महानवमी/विजयादशमी): महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने शनिवारी सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
13 ऑक्टोबर : रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत. तुम्ही बँकेची छोटी मोठी कामं ऑनलाईन शनिवार आणि रविवारी करू शकता.
14 ऑक्टोबर (दुर्गा पूजा): सिक्कीममध्ये सोमवारी बँका बंद राहणार आहेत.16 ऑक्टोबर: लक्ष्मी पूजा (अगरताळा, कोलकाता) 17 ऑक्टोबर: महर्षि वाल्मिकी जयंती/कटी बिहू इथे बँका बंद राहणार आहेत.
तीन दिवस बँकांना सुट्टी
टिप्पणी पोस्ट करा