Top News

अंगणवाडी सेविका होमगार्ड कोतवाल आणि ग्रामरोजगार सेवक यांच्या मानधनात वाढ




  ग्रामरोजगार सेवक यांच्या मानधनात वाढ

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत विविध कामे करतांना ग्राम रोजगार सेवक खूप महत्वाची भूमिका पार पाडत असतात.


कामाच्या तुलनेत मात्र ग्रामरोजगार सेवक यांना अत्यंत कमी मानधन मिळते. याच बाबीचे महत्व लक्षात घेवून राज्य शासनाने ग्रामरोजगार सेवक यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भाती जी आर देखील निर्गमित केलेला आहे.



ग्राम रोजगार सेवक यांना दरमहा ८ हजार रुपये मानधन मिळणार आहे. या शिवाय २ टक्के प्रोत्साहन अनुदान, प्रवास भत्ता, मोबाईल डेटा पॅक इत्यादी योजनांचा लाभ मिळणार आहे.


2000 दिवस काम केलेल्या ग्राम रोजगार सेवक यांना प्रती महिना १ हजार रूपये व २००१ दिवसांपेक्षा जास्त दिवस काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा २ हजार रुपये प्रवास भत्ता व डेटा पॅक करिता अनुदान देण्यात येणार आहे.


ग्रामरोजगार सेवक मानधनवाढ संदर्भातील शासन निर्णय पहा


मंत्री मंडळ निर्णय पहा


खालील व्हिडीओ पहा




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने