GMC BHARTI 2024 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज करावा लागेल. उमेदवारांची शैक्षणिक अर्हता / पदांचा तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परिक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सुचना इत्यादीची सविस्तर माहिती, पदांची नावे, पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे
■ भरती विभाग : संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
■ भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
■ भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन (राज्य सरकार) अंतर्गत ही पदे भरली जात आहेत.
■ पदाचे नाव : शिपाई, प्रयोगशाळा परिचर, मदतनीस, क्ष किरण परिचर, अपघात सेवक, कक्षसेवक व इतर पदे.
■ शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
■ मासिक वेतन : 15,000 ते 46,600 रूपये निवड करण्यात आल्यावर उमेदवारांना मासिक पगार दिला जाणार आहे.
■ पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा
■ अर्ज सुरू : 31 ऑक्टोंबर 2024 पासून या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
■ अर्ज स्विकारण्याची पद्धती ऑनलाईन.
■ वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष दरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मागासवर्गीय उमेदवारांना 18 ते 43 वय)
■ राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवछत्रपती
प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर मध्ये ही भरती करण्यात येत आहे.
■ भरती कालावधी कायमस्वरुपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
■ रिक्त पदे : 102 जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
■ नोकरी ठिकाण : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवछत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर.
■ निवड प्रक्रिया : 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा. परीक्षा वेळ 2 तास.
■ अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक: 20 नोव्हेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
■ अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या
टिप्पणी पोस्ट करा