Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana: राज्यातील ४६ हजार विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा पहिला हफ्ता मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत हे विद्यावेतन दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलीय. डीबीटी मार्फत ४६ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ४२ कोटी रुपये जमा होणार असल्याचं लोढा यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं..
लाडक्या बहिणीनंतर आता लाडक्या भावाच्या खात्यातही पैसे जमा होणार आहेत. राज्यातील ४६ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात विद्यावेतनाचा पहिला हप्ता जमा होणार आहे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. एक महिना ट्रेनिंग पूर्ण केलेल्या प्रशिक्षार्थींच्या खात्यात प्रत्येकी ६ ते १० हजार रुपये विद्यावेतन जमा केले जात असल्याची महिती लोढा यांनी मुंबईमध्ये दिली.
प्रत्येकाच्या खात्यात ६ ते १० हजार रुपये जमा होणार - मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मिळणारे विद्यावेतन विद्यार्त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. डीबीटी मार्फत ४६ हजार विद्यार्थ्यांना ४२ कोटी रुपये दिले जाणार आहेत, अशी माहिती लोढा यांनी दिली. जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु झाली. या योजनेत आत्तापर्यंत ३ लाख ६९ हजार ७९८ प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली. त्यातील १ लाख ७९ हजार ३१८ प्रशिक्षणार्थींना नियुक्ती देण्यात आली. यामध्ये ८७ हजार १४९ प्रशिक्षणार्थी रुजू झाले. १० हजार ५८६ अस्थापनांनी या उपक्रमात नोंदणी केली आहे.
एक महिना ट्रेनिंग पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींच्या खात्यात प्रत्येकी ६ ते १० हजार रुपये विद्यावेतन जमा केले जात आहे, असे लोढा यांनी सांगितले. राज्यात ४१७ आयटीआय मध्ये १४६ आयटीआयचे नामांतर केले आहे. उरलेल्या आयटीआयसाठी काय नाव द्यायचे, हे लोकांनी सांगावे, असे आवाहन लोढा यांनी पत्रकार परिषदेत केले.
सोमवारपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता आचारसंहिता सोमवारपर्यंत लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आचारसंहितेपूर्वी सर्व फाईल्स निकाली काढण्याचा आमचा मानस आहे. लोकांनी त्यांचे काही प्रश्न असतील, तर ते तात्काळ मांडावेत. लोकांचे प्रश्न मार्गी लावत झिरो पेंडन्सी फाईल ठेवण्याचा आमच्या विभागाचा प्रयत्न आहे, असे लोढा म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा