सेनगाव : केंद्र व राज्य शासनाच्या असलेल्या लोककल्याणकारी योजनेसाठी आवश्यक कागदपत्र म्हणून शिधापत्रिकेकडे बघितल्या जाते. त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून अतिशय कमी वेळात व विना शुल्क आता घरबसल्या ही शिधापत्रिका उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
राज्य सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या लोककल्याणकारी व अनुदान तत्त्वावरील योजन "साठी शिधापत्रिका म्हणून बघितल्या जात आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने नुकतेच एक परिपत्रक काढून त्या परिपत्रकामध्ये राज्यातील नागरिकांना आता तहसील व इतर सरकारी कार्यालयात खोटे
व चकरा माराव्या लागणार नाहीत.
या अनुषंगाने राज्य शासनाच्या अन्न व पुरवठा विभागाने शासनाच्या संकेतस्थळावरून प्रत्येक नागरिकांना आपल्या कुटुंबाचा ई शिधापत्रिका आता घरबसल्या अँड्रॉइड किंवा महा- ई-सेवा केंद्रांतर्गत अर्ज करून त्या अर्जासोबत कुटुंबासंबंधी असलेले आधार कार्ड, मतदान कार्ड, जुनी शिधापत्रिका, नमुना नंबर आठ, विद्युत बिल यासह इतर असलेले पुरावे ऑनलाइन सादर करून केलेली ऑनलाइन संचिका ऑफलाइन संबंधित पुरवठा विभागाकडे जमा करावी लागणार आहे.
ती संचिका योग्य पद्धतीने पुरवठा विभागाकडून तपासणी केल्यानंतर लगेचच संबंधित अर्जदारास ई-शिधापत्रिका तात्काळ उपलब्ध केल्या जाणार असल्याने या शासनाच्या निर्णयामुळे सामान्य माणसाचा खेडे गावातून तालुक्याच्या ठिकाणावर येणारा वेळ व पैसा दोन्ही वाचत असल्याने या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. सदर शिधापत्रिका ही कुठलेही शुल्क विना म्हणजे मोफत दिल्या जात असल्याची माहिती प्राप्त असून या ई-शिधापत्रिकेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याच्या वाद तालुका पुरवठा निरीक्षक विशाल लोहटे यांनी केले आहे
टिप्पणी पोस्ट करा