Top News

Cotton Storage Bags : कापूस साठवणूक बॅग साठी द्यावे लागणार हे हमीपत्र | महाडीबीटी शेतकरी योजना

 



Cotton Storage Bags : शेतकरी बांधवांना 100% अनुदांनावरती ९ कापूस साठवणूक बॅग वितरण करण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. 


तर, या कापूस साठवणूक बॅग ची सोडत ही महाडीबीटी पोर्टल द्वारे दिनांक 27 सप्टेंबर रोजी काढण्यात आली आहे. या सोडत मध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्यांना कृषि विभागा कडून कापूस साठवणूक बॅग ह्या करण्यास सुरुवात झाली आहे.


महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल ऑनलाइन प्राप्त अर्जा मधून सोडत काढण्यात आली असून त्या सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना कापूस साठवणूक बॅग (Cotton Storage Bags) ही 100% अनुदानावर म्हणजेच मोफत देण्यात येणार आहेत. तर, निवड झालेल्या शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि कार्यालय येथे कापूस साठवणूक बॅग उचल करण्यासाठी संपर्क करावा.


महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांनी नमूद केलेल्या क्षेत्रा नुसार कापूस साठवणूक बॅग देण्यात येणार आहेत. (Cotton Storage Bags)


1. 0.40 हे क्षेत्र असेल तर - 3 कापूस साठवणूक बॅग

2. 0.80 हे क्षेत्र असेल तर 6 कापूस साठवणूक बॅग

 3. 1.00 हे क्षेत्र असेल तर 8 कापूस साठवणूक बॅग


निवड झालेल्या शेतकऱ्यांना खालील कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत (Cotton Storage Bags) 


1. आधार झेरॉक्स प्रत 

2. सात बारा (कापूस पिकाची सात बारा वरती नोंद असणे आवश्यक)  

3. हमीपत्र येथे डाऊनलोड करा 


कापूस साठवणूक बॅग साठी द्यावयाचे हमीपत्र : डाऊनलोड करा



महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने