शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी योजना सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता पाचवा हफ्ता वितरित करण्यात येणार आहे. या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहे व या संदर्भात काही कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहे का ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे.
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण चार हप्ते वितरित करण्यात आलेली आहे हा पाचवा हफ्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे या संदर्भात महाराष्ट्र शासन अंतर्गत जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे.
या संदर्भातील सविस्तर माहिती व अधिकृत माहिती जर तुम्हाला हवी असेल तर लेखाच्या शेवटी जीआर डाऊनलोड करा असे बटन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही हा जीआर तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून ही संपूर्ण सविस्तर व अधिकृत माहिती वाचू शकता.
दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय मी बघा अंतर्गत हा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.
नमो शेतकरी योजना शासन निर्णय बघा
नमो शेतकरी महासन्माननिधी पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्याबाबत हा जीआर निर्मित करण्यात आलेला आहे. या अंतर्गत एकूण २२५४.९६ कोटी इतका निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात येत आहे
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये विकत करण्यात येते हे अनुदान शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून वितरित करण्यात येते.
आतापर्यंत एकूण चार हफ्ते नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले असून आता पाचवा हफ्ता वितरित करण्यात येणार आहे.
माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधी अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पाचवा हफ्ता हा वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती या जीआर मध्ये दिलेली आहे.
पात्र शेतकऱ्यांना हा हफ्ता दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीच्या आधी कधीही त्यांना हा हफ्ता मिळवू शकतो.
चौथा हफ्ता येण्यासाठी खूप वेळ पात्र लाभार्थ्यांना वाट पहावी लागली होती परंतु आता हा हफ्ता पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर च्या दरम्यान मिळू शकतो असा उल्लेख या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे.
जीआर डाऊनलोड करा. बघा संपूर्ण अधिकृत माहिती. किती निधी वितरीत करण्यात येणार. (नमो शेतकरी योजना)
टिप्पणी पोस्ट करा