PM KISAN Yojana : महाराष्ट्र शासन द्वारे केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील (Namo Yojana) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळणार आहेत. तसेच, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत चौथा हफ्ता अदा करणे साठी दिनांक 20 ऑगस्ट रोजी निधि देखील मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे आता लवकरच राज्य शासनाचा चौथा हाफता हा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना (Namo Scheme) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.
तर, त्याच धरतीवर आता महाराष्ट्र शासन देखील राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत वार्षिक 6000/- रुपये हे तीन हाफत्यात देणार आहे.
(PM KISAN Yojana) मागील महिन्यात 'नमो शेतकरी महासन्मान' योजनेचा 4 था हप्ता दिल्यानंतर लगेचच 5 व्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी २२५४ कोटी ९६ लाख रुपयांच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.
त्यामुळे आता दिनांक 05 ऑक्टोबर रोजी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 'नमो शेतकरी महासन्मान' योजनेचा 5 वा हफ्ता मिळणार आहे. (PM KISAN Yojana) तसेच, केंद्र सरकारकडून सर्व पात्र लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता वितरित करण्यात आला आहे आणि आता पीएम किसान योजनेचा 18 वा हफ्ता हा देखील 05 ऑक्टोबर रोजी वितरित करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
तर, आता राज्यातील 'नमो शेतकरी महासन्मान' व पीएम किसान योजना (PM KISAN Yojana) मध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दिनांक 05 ऑक्टोबर रोजी एकूण 4000/- रुपये मिळणार आहेत. कधी मिळणार पुढील लाभ? राज्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीमध्ये केंद्र व राज्य सरकारचा सहभाग मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे शुभहस्ते 'पी. एम. किसान' योजनेच्या १८ व्या हप्त्याचे व राज्याच्या 'नमो शेतकरी महासन्मान' योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरित करणार आहेत.
महाराष्ट्रातील सुमारे ९१.५३ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 'पी.एम. किसान सन्मान निधी' व राज्याच्या 'नमो शेतकरी महासन्मान निधी' या योजनांचे प्रत्येकी २००० रुपये. दि.५ ऑक्टोबर २०२४, दु. १२.०० वा. ठिकाण : वाशिम, महाराष्ट्र
कोणाला मिळणार 4000 रुपये ? (PM KISAN Yojana) पीएम किसान योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी 17 वा हाफता मिळाला आहे ते सर्व शेतकरी राज्य शासनाच्या या 5 व्या हफ्ता साठी पात्र असतील. ही माहिती अद्ययावत करा?
जर आपल्याला पीएम किसान योजनेचे यापूर्वी हफ्ते मिळत नसतील तर आपण खालील माहिती ही अद्ययावत करून घ्यावी जेणेकरून आपल्याला केंद्र शासनाचे पुढील हफ्ते व राज्य शासनाचा हफ्ता मिळणे सुरू होईल. 1. e-KYC करून घ्यावी 2. Aadhar Bank Account Seeding/आधार बँक खाते संलग्न करणे 3. Land Seeding / भूमी अभिलेख नोंद अद्ययावत करणे
टिप्पणी पोस्ट करा