Top News

Shravan Bal Yojana: ज्येष्ठ नागरिकांना सरकार महिन्याला देतेय १५०० रुपये, Shravan Bal Yojana नक्की आहे तरी काय?




  राज्य सरकारने महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि तरुणांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. अनेक योजनांमधून नागरिकांना आर्थिक मदत मिळते. महाराष्ट्र सरकारची अशीच एक योजना म्हणजे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला पेन्शन दिली जाते. राज्यातील निराधार आणि गरीब वृद्ध नागरिकांना सामाजिक न्याय विभागाकडून आर्थिक मदत केली जाते. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन दिली जाते.


ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात आर्थिक मदत मिळावी. त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी मदत केली जाते. या योजनेतून वृद्ध नागरिकांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम केले जाते. या योजनेत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या योजनेची रक्कम ज्येष्ठ नागरिकांच्या अकाउंटला जमा होणार आहे. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ही सामाजिक न्याय विभागाद्वारे राबवली जाते. ६५ वर्षांवरील निराधार वृद्ध नागरिकांना या योजनेत लाभ मिळतो. त्यामुळे आता वृद्ध नागरिकांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे. (Shravan Bal Yojana)


श्रावण बाळ योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला विहीत नमुन्यातील अर्ज द्यावा लागेल. तुमचे वय किमान ६५ वर्ष असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्ती किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहेत. आधार कार्ड, रेशन कार्ड, वोटर आयडी आणि बँक पासबुक आवश्यक आहे.त्याचसोबत रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो, उत्पन्नाचा दाखला असणे गरजेचे आहे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न २१,००० रुपयांपेक्षा कमी असावे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही तालुक्याच्या तहसील कार्यालयातील अटल सेतु केंद्राला भेट देऊ शकतात. किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. (Shravan Bal Yojana For Senior citizen)




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने