Aadhar Card News : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे एक अतिशय महत्त्वाचे आणि कामाचे शासकीय कागदपत्र अन ओळखीचा पुरावा आहे. अगदी सिम काढण्यापासून ते पैसे काढण्यापर्यंत सर्वच ठिकाणी आधार कार्डचा उपयोग होतो. आधार कार्ड हे पॅन कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड यांसारखे महत्त्वाचे कागदपत्र बनवण्यासाठी देखील वापरले जाते.
एवढेच काय तर बँकेत खाते खोलण्यासाठी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी, स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर होतो. आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असतो.
मात्र, जर आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर हरवला तर काय केले पाहिजे? असा सवाल अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान आता आपण आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर हरवला तर नवीन मोबाईल नंबर कसा ऍड करायचा याविषयी सविस्तर याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर हरवल्यास सर्वप्रथम काय करावे
आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर जर हरवला तर सर्व्यात आधी ते सिम कार्ड ब्लॉक करा. तुम्ही ज्या कंपनीचे सिम कार्ड आहे त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन किंवा एप्लीकेशनवर जाऊन तुमचे सिम कार्ड लॉक करू शकता.
किंवा कस्टमर केअरला फोन करूनही तुम्ही तुमचे सिम कार्ड लॉक करू शकता. आता सिम कार्ड लॉक झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आधार कार्ड सोबत नवीन मोबाईल नंबर लिंक करू शकणार आहात.
यासाठी, तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जा, आधार अपडेट/सुधारणा फॉर्म घ्या आणि तो भरा. यानंतर, आधार कार्डशी संबंधित सुधारणा फॉर्म भरा आणि सबमिट करा.
या प्रक्रियेसाठी तुम्हाला 30 रुपये लागतील. पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला एक पावती मिळेल, ज्यामध्ये अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) दिला जाईल.
हा नंबर वापरून तुम्ही तुमचा मोबाइल नंबर आधारमध्ये अपडेट झाला आहे की नाही हे तपासू शकता. आधार डेटामध्ये मोबाईल क्रमांक ९० दिवसांच्या आत अपडेट केला जातो.
टिप्पणी पोस्ट करा