शेतकऱ्यांना तर माहित असेल की शेतीसाठी सातबारा हा किती महत्त्वाचा असतो त्यामुळे आज ऑनलाईन सातबारा डाउनलोड कसा करायचा ही माहिती आपण बघणार आहोत. हाच सातबारा तुम्ही आता तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने अगदी काही मिनिटांमध्ये बघू शकता.
ऑनलाइन सातबारा बघण्यासाठी तुम्हाला विकास शासकीय वेबसाईटवर जाऊन तुमच्या सातबारा विषयी माहिती बघायला मिळणार आहे.
ही माहिती कशी बघायची यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहे का व यासाठी काही शुल्क लागणार आहे का ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमचा सातबारा अगदी काही मिनिटात तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने बघू शकता.
शेतीसाठी सातबारा अतिशय आवश्यक कागदपत्रांमधून एक आहे सातबारावर आपल्या जमिनीची संपूर्ण माहिती असते यामुळे सातबारा खूप खूप महत्त्वाचा कागदपत्र.
तसा सातबारा तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने सुद्धा मिळतो पण जर ऑफलाइन पद्धतीने मिळालेला सातबारा तुमच्याकडून हरवला असेल किंवा तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुमचा सातबारा अगदी मोफत होणे बघू शकता. ऑनलाइन पद्धतीने सातबारा कशाप्रकारे बघायचा व यासाठी कोणती वेबसाईट आहे बघा संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
ऑनलाईन सातबारा बघा मोफत अशा पद्धतीने
या ठिकाणी तुम्ही फक्त सातबाराच नाही तर तुमचा जमिनीचा आठ सुद्धा बघू शकता. हा सातबारा आणि आठ अ डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला महाभूमी या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला आपल्या राज्यातील संपूर्ण जिल्हे या ठिकाणी दाखवण्यात येईल. या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला एक विभाग निवडा असे पर्याय दिसेल या पर्यायावर तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे.
तुमचा विभाग निवडल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी विभाग च्या समोर एक go या बटनावर टच करायचे आहे. आता तुम्हाला या ठिकाणी परत काही माहिती भरावी लागणार आहे ही माहिती कशा पद्धतीने भरायची बघा.
तुम्हाला सातबारा हवा असेल तर या ठिकाणी सातबारा हा पर्याय निवडा व त्यावरती टच करा. यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडायचे आहे.
गाव निवडताना मात्र एक गोष्ट लक्षात असू द्या ज्या ठिकाणी तुमची जमीन आहे तेच गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे.
आता खाली तुम्हाला भरपूर पर्याय दिसेल यापैकी कोणताही एक पर्याय निवडा आणि शोधा या पर्यायावर टच करा.
आता या ठिकाणी तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे आणि भाषा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा चालू मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकावा लागणार आहे.
तुम्हाला परत एकदा सातबारा पहा असे एक ऑप्शन दिसेल त्यावर टच करा. आता या ठिकाणी तुम्हाला कॅपच्या टाकायचा आहे.
कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हेरिफाय कॅपच्या या बटणावर टच करायचे आहे.
या ठिकाणी भरलेली संपूर्ण माहिती ही योग्य आहे का याची खात्री करा.
अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचा सातबारा बघू शकता.
टिप्पणी पोस्ट करा