Top News

जळगाव महानगरपालिकेत 12वी पासवर मोठी भरती पगार 20 हजार परीक्षा नाही ! Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024

 




मित्रांनो नमस्कार,  Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 या महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठीची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये कोणतीही परीक्षा नसून थेट निवड त्या ठिकाणी केली जाणार आहे. ही भरती नेमकी कोणत्या महानगरपालिका अंतर्गत सुरू झालेली ?



या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, पदाचे नाव, पदसंख्या, असेल नोकरी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला करावे लागणार ? यासाठी वयोमर्यादा काय असेल पगार किती रुपये मिळणार ? अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता आणि या भरती संदर्भातील सविस्तर माहिती खालील देण्यात आली आहे.


भरती विभाग :  जळगाव शहर महानगरपालिका या अंतर्गत भरती होत आहे.


पदाचे नाव : स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला)एमपीडब्ल्यू या पदासाठीची जळगाव शहर महानगरपालिकेकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.


पद संख्या : वरील स्टाफ नर्स पुरुष, स्टाफ नर्स महिला, MPW या पदासाठी एकूण 45 रिक्त जागा भरण्यात येत आहे.


वयोमर्यादा : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असलेले उमेदवार 18 वर्षे किमान व कमाल आणि खुल्या प्रवर्गातील प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागासवर्गीय यांच्यासाठी 43 वर्ष वयोमर्यादा जास्तीत जास्त राहणार आहे.


पगार दरमहा : स्टाफ नर्स यासाठी 20,000 रुपये एमपीडब्ल्यू यासाठी 18,000 रुपये दरमहा पगार वरील पदांसाठी जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत मिळणार आहे.


अर्ज करण्याची पद्धत : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असलेले उमेदवारांना शेवटच्या तारखे अगोदर ऑफलाइन पद्धतीने संबंधित पत्त्यावरती अर्ज सादर करायचा आहे.


अर्ज सादर करण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहूनगर जळगाव – 425001 या पत्त्यांवरती अर्ज पाठवायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : वरील पदासाठी तुम्ही पात्र असाल इच्छुक असाल तर या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे, हे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे.



नोकरी ठिकाण : जळगाव महाराष्ट्र


 

अर्ज पद्धत : ऑफलाईन


शैक्षणिक पात्रता स्टाफ नर्स : यासाठी जीएनएम, बीएससी नर्सिंग्स, एमपीडब्ल्यू : बारावी त्यामध्ये सायन्स पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स या ठिकाणी असणे गरजेचे आहे.


भरती प्रक्रिया : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रिया मधून जात असताना इंटरव्यू या ठिकाणी द्यावा लागणार आहे.


ही होती जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या 45 रिक्त पदासाठीची भरती, या भरतीमध्ये स्टाफ नर्स पुरुष, स्टाफ नर्स महिला, पदासाठीची भरती होती. यामध्ये बारावी सायन्स असलेली उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.


अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी,, ही होती महत्त्वपूर्ण माहिती अर्ज कसा करायचा अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचावी धन्यवाद.


मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने